चाफ्याची फुले वेचावीत वाकून,
___रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.
आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा,
___रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा.
चाफा बोलेना चाफा चालेना,
___च माझ्याशिवाय पानच हलेना.
गळ्यात मंगळसूत्र हि सौभाग्याची खून,
___रावांचे नाव घेते___ची सून.
संसाराची सुरवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
___रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन.
उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.
आकाशात रात्रीचे चमकतात चंद्र आणि तारे,
___रावांसाठी सोडून आले मी सारे.
तुम्ही सर्वांनीं मिळून पसंद केली आमची जोडी,
___रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष,
___रावांचे नाव घेते ईकडे द्या लक्ष.
नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल,
___रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल.
सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण,
___रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण.
मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार.