22) Love Birthday Wishes In Marathi | प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा


प्रत्येक वेळी जेव्हाही मी तुला पाहते, तेव्हा मी प्रत्येक वेळी नव्याने तुझ्या प्रेमात पडते. ही जादू अशी घडते आणि माझे मन तुझ्यावर पुन्हा पुन्हा जडते. माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर, सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या प्रेमळ हृदयात सदैव तेवत राहो हीच आजच्या खास दिवशी शुभकामना..Happy Birthday My Love 

आज काल माझ्या स्वप्नांनाही तुझी संगत झाली आहे, तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला रंगत आली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू नेहमी निरोगी राहावे, तंदुरुस्त राहावे आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करावे. भूतकाळ विसरून जावे आणि नेहेमी भविष्याकडे मार्गस्थ व्हावे हीच देवाकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्या इतकी जवळ येते कि त्या व्यक्तीशिवाय आयुष्याची कल्पना देखील करवत नाही. माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती तूच आहेस. तुला आयुष्यात सगळी सुखे मिळावी आणि त्या क्षणांना मी जीवनसाथी म्हणून तुझ्या बरोबर असावे हीच आज मनोकामना आहे. Happy Birthday My Love 

नशिबाने माझी  साथ सोडली तरी तू कायम माझ्या सोबत चालत राहिला, तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला एक नवा अर्थ मिळाला! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिय ….! 

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम